5 Dariya News

एक दीवाना था चे चित्रीकरण करताना विक्रमएला जखम झाली

5 Dariya News

मुंबई 21-Nov-2017

आकर्षक आणि देखणा विक्रम सिंह चौहान म्हणजे एक दीवाना था मालिकेतील व्योम हा दिग्दर्शकाचा अभिनेता आहे, जो व्यक्तिरेखेची नस पकडण्यासाठी नेहमी अतिरिक्त प्रयत्न करण्यास तत्पर असतो | एक दीवाना था च्या आगामी भागात शरण्याला (डोनल बिष्ट) रिझवण्यासाठी विक्रम गिटार वाजवताना दिसणार आहे | तो हा अभिनय करण्यात इतका तल्लीन झाला की, त्याच्या लक्षातच आले नाही की त्याच्या बोटांमधून रक्त वाहू लागले आहे | या रक्तस्रावामुळे विक्रमने चित्रीकरण थांबवले नाही तर शॉट ओके होईपर्यंत तो तारा छेडत राहिला | विक्रमला याबद्दल विचारले असता तो म्हणाला, च्च्माझ्यासाठी अभिनय हा केवळ व्यवसाय नही; तर ते माझे वेड आहे | प्रेक्षकांपुढे उत्कृष्ट कामगिरी सादर करण्याचा प्रयत्न मी सदैव करतो | या गिटार वाजवण्याच्या दृश्यासाठी चित्रीकरण करत असताना मला सतत तारा छेडत राहणे गरजेचे होते, कारण मी शरण्यासाठी के प्रेमगीत गात असतो | हे दृश्य पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मी माझ्या व्हॅनिटीत गेलो, तेव्हा माझ्या लक्षात आले की बोटांतून रक्त येत आहे! मी त्या दृश्यात इतका मग्न झालो होतो, की मला लागल्याचे मला समजलेच नाही | सेटवरील लोकांनी मला लगेच प्रथमोपचार दिले त्यामुळे मला आराम पडला |ज्ज्एक दीवाना था च्या आगामी भागांत शरण्या (डोनल बिष्ट अभिनीत) व्योमवर नाराज असणार आहे कारण तिच्या गत जीवनाबद्दल ओढणीचा सल्ला घेण्यास तो तिला मनाई करत आहे | व्योम शरण्याच्या घरी जातो आणि तिला रिझवण्यासाठी एक गीत गातो व तिचे प्रेम जिंकतो, तर शिव आपल्या गूढ शक्तीचा उपयोग करून त्या दोघांना एकमेकांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो |